वनविभाग रोहा येथे सर्वोत्कृष्ट नाविण्यपूर्ण व विकासात्मक प्रभावी कार्य केल्याबद्दल श्री.अप्पासाहेब निकत यांना राज्यस्तरीय रजत पदक व सन्मानपत्र प्रदान

 

 

अलिबाग,दि.05 (जिमाका) :- रोहा उप वनसंरक्षक श्री.अप्पासाहेब निकत यांना सन 2016 ते 2019 या कालावधीत विभागीय वन अधिकारी या पदावर कार्यरत असतांना त्यांनी 50 कोटी वृक्ष लागवड, चार जैवविविधता बन उद्यानांची निर्मितीव्दारे वनविस्तार, वनविषयक जनजागृती, महाराष्ट्र हरित सेना सदस्य नोंदणी करुन लोकांचा वन विस्तार करण्याकामी सहभाग, कन्या वन समृध्दी शेताच्या बांधावर वृक्ष लागवड निसर्गाची उपासना करण्याकामी जन्म वृक्ष माहेरची झाडी अशा नाविन्यपूर्ण उपक्रम, अटल आनंदवन घन वन ची श्रमदानातून प्रायोगिक तत्वावर यथस्वी निर्मिती आणि विषयावर पुस्तक लेखन व छायाचित्रण तसेच वन विस्तारासाठी तालुकास्तरीय 11 नवीन आधुनिक रोपवाटिका तयार केल्या, अशी सर्वोत्कृष्ट नाविण्यपूर्ण व विकासात्मक प्रभावी कार्य केल्याबद्दल उप वनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत यांना मंत्री (वने) श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते (दि. 18 डिसेंबर 2022) रोजी वसंतराव देशपांडे सभागृह, आमदार निवास समोर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे राज्यस्तरीय रजत पदक व सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक