कोकण सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगडमधील आपत्ती व्यवस्थापन नियोजनाकरिता जिल्हा प्रशासनाकडून 1 हजार 800 कोटींचा प्रस्ताव शासनास सादर

 


अलिबाग,दि.5(जिमाका):- कोकण सौम्यीकरण योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील नवीन व जुन्या खार बांधांचे नूतनीकरण करणे, समुद्र धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण गावांमध्ये बहुउद्देशिय निवारा केंद्र बांधणे, चक्रीवादळ, पूर व दरडप्रवण प्रमुख तालुका मुख्यालय व आपत्तीप्रवण गावांमध्ये भूमीगत विद्युत वाहिनी टाकणे, महाड शहरनजिक सावित्री नदीलगत संरक्षक भिंत बांधणे, बीएसएनएल चे दूरध्वनी भूमीगत लाईन टाकणे, महाड नगरपरिषदेसाठी आवश्यक आपत्कालीन सोयी सुविधा निर्माण करणे, निवारा शेडमध्ये आवश्यक शोध व बचाव साहित्य उपलब्ध करणे इ. विविध आपती सौम्यीकरणाचे प्रस्ताव जिल्हयातील कार्यान्विय यंत्रणांकडून प्राप्त झाले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दि. 21 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीमध्ये हे प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनास सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासनास सादर केलेल्या प्रस्तावबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे : खारप्रतिबंधक बांध- नवीन बांध (1) रक्कम रुपये 476.09 जुने बांधाचे पुनर्जीवन (45) रक्कम रुपये 21 ,223.88 एकूण रक्कम रुपये 21,699.97 (सर्व रुपये लाखात)

समुद्र धूपप्रतिबंधक बांध- नवीन बांध (28) रक्कम रुपये 25,195.00, जुने बांधाचे पुनर्जीवन (8) रक्कम रुपये 8,472.00, एकूण रक्कम रुपये 33,667.00(रुपये लाखात)

बहुउद्देशीय निवारा केंद्र :- मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडील श्रीवर्धन तालुक्यातील 10 व म्हसळा तालुक्यातील 4 अशा 14 गावांमध्ये बहुद्देशीय निवारा शेडचे नवीन बांधकामासाठी शासकीय जागा उपलब्ध आहे. या निवाराशेड बांधकामासाठीचा एकूण खर्च रक्कम रुपये 610.00 (रुपये लाखात)

 उपविभागीय अधिकारी, महाड यांच्याकडील महाड तालुक्यातील 14 पोलादपूर तालुक्यातील 7 गावांमध्ये अशा 21 निवाराशेड बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध असल्याने या ठिकाणी निवाराशेड बांधकामासाठी एकूण खर्च प्रस्ताव 3,071.38 (रुपये लाखात)

कार्यकारी अभियंता, पत्तन अभियांत्रिकी विभाग, रायगड यांच्याकडील प्रस्तावानुसार श्रीवर्धन तालुक्यातील दिघी व मुरुड तालुक्यातील बोर्ली गावांमध्ये निवाराशेडसाठी शासकीय जागा उपलब्ध आहे. यापूर्वी NCRMP टप्पा-2 मध्ये या दोन्हीही निवारा शेड मंजूर आहेत. तथापि अद्याप पुढील आदेश नसून बांधकाम सुरु झाले नसल्याने सुधारित दरसूचीनुसार हे प्रस्ताव फेर सादर करण्यात आला आहे.  रक्कम रुपये 4,150.00 (रुपये लाखात)

उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांनी अलिबाग तालुक्यातील 20 राजिप शाळा व मुरुड तालुक्यातील 17 रायगड जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासकीय जागा उपलब्ध असलेले नवीन निवारा शेडच्या बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी एकूण रक्कम रुपये 8,214.38  (रुपये लाखात)

निवाराशेड साठी शासकीय जागा उपलब्ध नाही अशा महाड तालुक्यातील 53 व पोलादपूर तालुक्यातील 33 अशा एकूण 86 गावांच्या निवारा शेडच्या बांधकामाचा अंदाजित खर्च रुपये  (यापूर्वी या कार्यालयाकडील पत्र दि. 23/06/2022 अन्वये महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडप्रवण गावांमध्ये निवाराशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. एकूण रक्कम रुपये 9,170.51  (रुपये लाखात)

 

 वरील 86 गावांच्या निवाराशेडसाठी खाजगी जागेच्या भूसंपादनासाठी अंदाजित खर्च रुपये 1,610.00 (रुपये लाखात) शासकीय जागा उपलब्ध नसलेले निवारा शेडच्या बांधकामासाठी एकूण रक्कम रुपये 10,780.51 (रुपये लाखात) असे एकूण मिळून रक्कम रुपये 14,461.89  (रुपये लाखात)

भूमीगत विद्युत वाहिनी टाकणे- अलिबाग 1 व 2, महाड, म्हसळा, पेण, पोलादपूर, मुरुड, रोहा, तळा, उरण, श्रीवर्धन या 11 तालुका मुख्यालय व इतर महत्वाच्या गावांमध्ये भूमीगत विद्युत वाहिनी टाकणे रक्कम रुपये 1,06,756.14  (रुपये लाखात)

बीएसएनएल सार्वजनिक बांधकाम विभाग महाड, तहसिलदार कार्यालय महाड, तहसिल कार्यालय पोलादपूर, नगरपरिषद महाड, श्रीवर्धन या विभागांचे उपविभागीय अधिकारी महाड़ व श्रीवर्धन यांच्याकडून आपत्ती सौम्यीकरण अंतर्गत प्राप्त प्रस्तावांची एकूण रक्कम रुपये 12,659.70 असे सर्व मिळून रक्कम रुपये 1,89,244.70 (रुपये लाखात)

 

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक