महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

 


 

अलिबाग,दि.2(जिमाका): महिला व बाल विकास विभागाच्या दि. 04 डिसेंबर 2012 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व मुले व प्राधान्याने बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव सांधिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी 35 जिल्ह्यांमध्ये 6 विभागीयस्तर व जिल्हास्तर चाचा नेहरु बाल महोत्सव सन 2022-23 आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय व स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, बालकांसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्यातर्फे जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग, नेहुली संगम येथे मंगळवार, दि.03 जानेवारी ते गुरुवार, दि.5 जानेवारी 2023 या कालावधीत जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार, दि.03 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11.00 वा. तर बक्षीस वितरण समारोप कार्यक्रम गुरुवार, दि.5 जानेवारी 2023 रोजी दुपारी 12.00 वा. जिल्हा क्रीडा संकुल, अलिबाग, नेहुली संगम येथे होणार आहे.

या महोत्सवामध्ये कबड्डी, खोखो, 400 मीटर रिले, 200 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, कॅरम, गोळा फेक, भाला फेक, बुध्दीबळ, निबंध स्पर्धा हस्ताक्षर, वक्तृत्व/भाषण, कविता वाचन, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वैयक्तिक नृत्य. सामूहिक नृत्य, समूहगीत, वैयक्तिक गीत, हस्ताक्षर, शुध्दलेखन अशा विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन  करण्यात आले आहे.

तरी या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी, नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक