जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा - उद्योग मंत्री सुभाष देसाई



जेनेरिक औषधांचा लाभ सर्वांनी घ्यावा
                                                                  -   उद्योग मंत्री सुभाष देसाई
अलिबाग दि.27 (जिमाका) जेनेरिक औषधांचा वापर हा आरोग्यासाठी लाभदायक असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज माणगांव येथे केले. प्रबोधन गोरेगांव ग्राहक संस्था मर्यादित संस्थेच्यावतीने माणगांव येथे सुरु करण्यात आलेल्या रायगड जिल्हयातील जेनेरिक औषध पेढीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.            यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते.
मंत्री महोदय पुढे बोलताना म्हणाले की, प्रबोधन औषधपेढी ही महाराष्ट्रातील पहिली जेनेरिक ISO-9001-2015 औषधपेढी आहे. शरीर स्वास्थासाठी जेनेरिक औषधे उपयुक्त असून याचे दर देखील सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. ही औषधपेढी सुरु करण्यचा मुख्य उद्देश गरीब गरजूनां कमी दरात म्हणजेच सवलतीत औषध उपलब्ध व्हावती हा असल्याने सर्वच ग्राहकांना ब्रँडेड औषधांवर 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. या औषध पेढीच्या माध्यमातून ना-नफा-ना-तोटा या तत्वावर गरजू आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना 50 टक्के आणि 100 टक्के मोफत औषधे पुरविण्यात येतात. प्रबोधन औषधपेढीद्वारे गरजू रुग्णांना केवळ परतावा असलेली अनामत रक्कम घेऊन विविध प्रकारच्या सर्जिकल वस्तू देखील पुरविण्यात येतात.  प्रबोधन औषध पेढी या बाबत उत्तम कार्य करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रबोधनचे जेनेरिक औषधांची माहिती देणारे मोबाईल ॲप (PGMS) https://goo.gl/pdW7ei ह्या लिंक वरुन डाऊनलोड करुन घेऊ शकता. याचे संकेतस्थळ www.prabodhaaushadhpedi.org  असे आहे. यावेळी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक