इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट अंतर्गत यांत्रिक बोटीची नोंदणी आवश्यक --प्रादेशिक बंदर अधिकारी

इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट अंतर्गत
यांत्रिक  बोटीची नोंदणी आवश्यक
                                        --प्रादेशिक बंदर अधिकारी
अलिबाग,दि.25:-(जिमाका)-प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह, ठाणे यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसई, धरमतर, उल्वा, बेलापूर, ट्रॉम्बे,कल्याण-भिवंडी, मांडवा, करंजा, मोरा व तापोळा डॅम येथील जलयान मालकांनी इनलॅण्ड् व्हेसल ॲक्ट अंतर्गत
यांत्रिक  बोटीची नोंदणी आवश्यक असल्याचे परिपत्रक कॅप्टन विनायक इंगळे, प्रादेशिक बंदर अधिकारी, मोरा बंदरे समूह, ठाणे यांनी जारी केले आहे.

या परिपत्रकात असेही म्हंटले आहे की,ज्या यांत्रिक जलयानांची नोंदणी Identification Number (ओळख क्रमांक) अंतर्गत करण्यात आलेली आहे. अशा सर्व जलयान मालकांना आय.डी.अंतर्गत नोंदणी असलेल्या यांत्रिक जलयानांच्या नोदणीस महालेखाकार (लेखापरिक्षा), मुंबई यांनी आक्षेप घेतल्यामुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबई यांच्या आदेशानुसार या कार्यालयाकडे आय.डी.अंतर्गत करण्यात आलेली यांत्रिक बोटींची नोंदणी रद्द करण्यांत आली आहे. अशा सर्व जलयान मालकांनी  आय.डि. अंतर्गत मूळ नोंदणी प्रमाणपत्र या कार्यालयात जमा करण्यात यावे.
इनलॅण्ड् व्हेसल ॲक्ट 1917 नुसार नोंदणी ही दिनांक 1 मार्च 2017 पासून ऑनलाईन पद्धतीने चालू झाल्याने आपल्या यांत्रिक बोटींची नोंदणी इनलॅण्ड व्हेसल ॲक्ट-1917 अंतर्गत आपले अर्ज aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरुन नोंदणी करण्यात यावी. असे या परिपत्रकात नमूद आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक