वयोवृद्ध खेळाडूंना मानधन संबंधितांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन

वयोवृद्ध खेळाडूंना मानधन
संबंधितांनी प्रस्ताव देण्याचे आवाहन
अलिबाग,दि.25:-(जिमाका)- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृद्ध खेळाडूंना त्यांच्या वृद्धापकाळात वित्तीय सहाय्य मिळावे यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्यामार्फत सन 2017-18  या वर्षाकरिता वयोवृद्ध खेळाडूंना मानधन ही योजना सुरु केली आहे.
रायगड जिल्ह्यातील संबंधित खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी याबाबतचे   प्रस्ताव द्यावेत तसेच या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक