राज्य युवा पुरस्कार अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुद

राज्य युवा पुरस्कार
अर्ज करण्यास 31 मे पर्यंत मुदत
अलिबाग, दि.24(जिमाका)- जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यस्तर युवा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतात. त्यासाठी संबंधितांनी 31 मे पर्यंत अर्ज करावेत असे आवाहान जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.
या पुरस्काराचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे.राज्यस्तरावर युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक,एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना पुरस्कार देण्यात येतील. गौरवपत्र,सन्मानचिन्ह,रोख रु.50हजार वैयक्तिक पुरस्कार तर संस्थेकरीता गौरवपत्र,सन्मानचिन्ह रोख रु. 1,लाख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
युवा युवतींसाठी पात्रतेचे निकष - अर्जदार युवक,युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्षे पूर्ण व 31 मार्च  रोजी 35 वर्षापर्यंत असावे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी राज्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागून दिला जाणार नाही, पुरस्कार मरणोत्तर जाहिर करण्यात येणार नाही, केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक (उदा.वृत्तपत्र कात्रणे,प्रशस्तिपत्रक,चित्रफित,फोटो, इ.)अर्जदार युवक व युवतीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान 2  वर्षे क्रियाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठ अंतर्गत महाविदयालयातील प्राध्यापक, कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
संस्थेसाठीचे निकष- अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा 1950 नुसार पंजीबद्ध असावी,अर्जदार संस्थांचे कार्य हे स्वयंस्फुर्तीने केलेले असावे,संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ  पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक, (उदा. वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तिपत्रक, चित्रफीत, फोटो इ.),अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान 2 वर्ष क्रीयाशील कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र देणे आवश्यक राहील.,अर्जदार,संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेल्या चारित्र्याचा दाखला (संबंधित परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन ) देणे आवश्यक राहील, एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्ह्यात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही तसेच पुरस्कार संस्थेस विभागून दिला जाणार नाही.
पुरस्कारासाठी साधारणत: पुढील स्वरुपाचे काम असणे अपेक्षित आहे, यात युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांनी केलेले कार्य दि.1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत 3 वर्षाची केलेली कार्य कामगिरी विचारात घेतली जाईल,युवा अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य, राज्याचे साधनसंपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य,समाजातील दुर्बल घटक,अनुसूचित जाती,जमाती आदिवासी भाग इ.बाबतचे कार्य,शिक्षण,प्रौढ शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, क्रीडा, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमिकरण, स्त्रीभृण, व्यसनमुक्ती, तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य. राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य., नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपटपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, साहस आदी  बाबत कार्य असा समावेश आहे.
राज्यस्तर युवा पुरस्कारासाठी रायगड जिल्ह्यातील कार्यरत युवक,युवती व युवा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र अ आणि ब प्राप्त करुन घेण्याकरिता व अधिक माहितीकरीता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली संगम, वेश्वी, अलिबाग येथे संपर्क साधावा. विहीत नमुना अर्ज क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अर्ज प्राप्त करुन घेऊन दिनांक 31 मे 2017 पर्यंत कार्यालयीन वेळेत कार्यालयात सादर करावा.



0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक