नारी शक्ती पुरस्कारासाठी मागविले अर्ज



अलिबाग, जि. रायगड, दि.04 (जिमाका)- अपवादात्मक परिस्थितींमध्ये महिलांच्या आर्थिक सामाजिक सबलीकरणाच्या क्षेत्रांमध्ये किंवा या विषयाशी संबंधीत किंवा आनुषंगीक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे पात्र आहेत. दि. 01/11/2019 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्षे आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत. 
पारंपारीक अपारंपारीक क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती इ. अपारंपारीक क्षेत्रांमध्ये ठोसपणे सार्थपणे बचाव सुरक्षा, आरोय निरोगीपणा, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य, महिलांचा आदर प्रतिष्ठा इ. बाबत कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना नारी शक्ती पुरस्कार दिला जातो.  
अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे www.narishaktipuraskar.wcd.gov.in या वेबसाईटवर भरायचे आहेत. सदर वेबसाईटची लिंक महिला बाल विकास मंत्रालयाच्या www.wcd.nic.in या कार्यालयीन वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावे. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख ही 07/01/2020 आहे. स्व-नामनिर्देशने आणि शिफारशी दोन्हीही स्विकारले जातील. राज्य शासन, अशासकीय संस्था, विदयापिठ / संस्था / गट / संघटना, खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमे हे देखील ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशने सादर करु शकतात.     नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्था / गट / संघटना यांना उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्यास आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक