कातकरी उत्थान कार्यक्रमांतर्गत सागरगडमाची येथील आदिवासीवाडीवर विविध दाखले वाटप व आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न

 

 

अलिबाग,दि.2,(जिमाका):-आदिवासी समाजाच्या मुलभूत गरजांची पूर्तता होण्यासाठी रायगडचे भूतपूर्व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कातकरी उत्थान अभियानांतर्गत सात कलमी कार्यक्रम राबविला. तेवढ्यात तत्परतेने कातकरी उत्थान अभियानांतर्गत सात कलमी कार्यक्रम अभियान विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे राबवित आहेत.

याच अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार श्री.बळवंत वालेकर यांच्या मागणीनुसार शासन आपल्या दारी या धोरणानुसार आज सागरमाची येथील आदिवासी वाडीवर विविध दाखले वाटप व आरोग्य शिबिर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी खंडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रंजना नाईक, अलिबागचे उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे, तहसिलदार श्री.अक्षय ढाकणे व अमोल शिंदे, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.जंजिरकर, डॉ.हुलवान  व त्यांचे सहकारी, आरोग्य अधिकारी डॉ.स्मिता म्हात्रे, मंडळ अधिकारी श्री.मांढरे, आरोग्य सेविका दिपाली भोनकर, तलाठी पल्लवी भोईर उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत ढगे म्हणाले की, शासन आपल्या दारी या धोरणानुसार विविध दाखले वाटप व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध दाखल्यांसाठी आपणाला तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही.  तसेच विविध दाखल्यांचे वाटप व आदिवासी बांधव-भगिनींची आरोग्य तपासणी याच वाडीवर होत असल्याने याचा लाभ सर्व आदिवासी बांधवांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना केले.  या आदिवासीवाडीसाठी भौतिक सोयी-सुविधा मिळण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्री.बळवंत वालेकर गेली 28 वर्षे प्रयत्न करीत आहेत. ते करीत असलेल्या कामाचे श्री.ढगे यांनी यावेळी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार श्री.बळवंत वालेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत केले. तसेच सागरमाची येथील आदिवासी वाडीच्या असलेल्या समस्या विषद केल्या.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ अनंत गोविंद नाईक, कृष्णा झांजू नाईक, संदिप पाटील, चंद्रकांत पाटील तसेच सागरगडमाची प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, अंगणवाडीचे विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक