नेहरू युवा केंद्राद्वारे प्रत्येक तालुक्यामध्ये होणार राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांची भरती इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह 9 मार्च पूर्वी अर्ज करावेत


 

अलिबाग,दि.27(जिमाका) :- नेहरु युवा केंद्रांतर्गत प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालयामध्ये संगणक विभागामध्ये काम करण्याकरिता दोन स्वयंसेवक म्हणून युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुक, पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दि.9 मार्च 2023 पूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, रायगड निशांत रौतेला यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये युवकांचे नेटवर्क तयार करणे, भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये सहभाग घेणे, युवकांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये योगदान देण्याची संधी, भारत सरकार द्वारा युवकांच्या नेतृत्व गुणांची क्षमता व त्यांची उर्जा स्वयंसेवेच्या माध्यमातून राष्ट्र निर्माण कार्यामध्ये वापर करणे,त्याचप्रमाणे साक्षरता, स्वच्छता, आरोग्य, लिंगभेद, सामाजिक समस्यांबाबत जनजागृती अभियान राबविणे, त्याकरिता युवकांना संगठीत करणे, युवक, महिला मंडळे यांच्याशी संपर्क वाढविणे, त्यांचा दुवा म्हणून कार्य करणे, शासकीय विभागाच्या सहकार्याने विविध कार्यक्रम राबविणे तसेच सहकार्य करणे याकरिता प्रत्येक तालुक्यामध्ये दोन व कार्यालयामध्ये संगणक विभागामध्ये काम करण्याकरिता दोन स्वयंसेवक म्हणून युवक युवतींची निवड करण्यात येणार आहे.

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.  वयोमर्यादा 01 एप्रिल 2023 रोजी  18 पेक्षा जास्त व 29 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.  अर्जदार नियमित विद्यार्थी किंवा नोकरी करणारा नसावा. निवड झालेल्या युवा स्वयंसेवकाला दर महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येइल.   उमेदवार संबंधित तालुक्यातील रहिवासी असावा.   राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पद हे पगाराची नोकरी नाही तसेच स्वयंसेवक हा कायदेशीररित्या सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या रोजगाराचा दावा करण्यास पात्र नसेल.  अधिक माहिती व अर्ज www.nyks.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.   आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.9 मार्च 2023 आहे.

तरी अधिक माहितीकरिता जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र रायगड-अलिबाग येथे कार्यालयीन वेळेमध्ये (सकाळी 10 ते सायं. 5) संपर्क साधावा, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, रायगड निशांत रौतेला यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक