नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 

            अलिबाग,दि.3,(जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, मुंबई विभाग, कोकण भवन, नवी मुंबई. आणि स्वमन ह्यूमन राईटस कौन्सिल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 11 मार्च 2023 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 वा शगुन बॅक्वेट हॉल, शगुन बसस्टॉप समोर, बामणडोंगरी रेल्वेस्टेशन जवळ, सेक्टर-19, उलवे नोड, नवी मुंबई येथे बेरोजगार उमेदवारांसाठी महारोजगार मेळावा आयोजित केला आहे.

       जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  या रोजगार मेळाव्यात एस.एस.सी. पास, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, इत्यादी नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

       या संयुक्त विभागीय महारोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार युवकासाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनाविषयीची माहीती उमेदवारांना दिली जाणार आहे.

       रोजगार मेळाव्यातील रिक्त पदांची माहिती www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील नोकरी/उद्योगधंदा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या विभागाच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून ऑनलाईन अप्लाय/अर्ज करून मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या संयुक्त विभागीय महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मुंबई विभागाचे उपआयुक्त श्री.शा.गी.पवार व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग च्या  सहायक आयुक्त श्रीमती. अ.मु.पवार  यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक