जवाहर नवोदय विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

 


 

अलिबाग,दि.28(जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, माणगाव येथे (दि.27 फेब्रुवारी 2023) रोजी मराठीतील ज्येष्ठ कवी, लेखक तसेच नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन अर्थात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

             या कार्यक्रमासाठी मराठी भाषा शिक्षक कैलास वाघ, सुनील बिरादार, समुपदेशक संदीप निकम, विज्ञान शिक्षक अण्णासाहेब पाटील, हिंदी शिक्षक अर्जुन गायकवाड, ग्रंथपाल संतोष चिंचकर, संगणक शिक्षक मुकेश सुमन,संगीत शिक्षक केदार केंद्रेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

             मराठी भाषेतील विविध साहित्यिक आणि त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती यावर प्राचार्य के.वाय.इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर मराठी विभागाच्या वतीने कैलास वाघ यांनी मराठी साहित्यातील विविध साहित्य प्रकारांची विद्यार्थ्यांना थोडक्यात ओळख करून दिली. सुनील बिरादार यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे प्राचीनत्व यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली.   

              कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मराठी पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला.

       कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य के.वाय.इंगळे यांच्या शुभहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आली.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक केदार केंद्रेकर यांनी केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक