जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट रायगड कार्यालयाकरिता विविध प्रकारची वाहने भाडे तत्त्वावर पुरविण्यासाठी इच्छुकानी निविदा सादर कराव्यात

 

अलिबाग,दि.3,(जिमाका):- प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट रायगड कार्यालयाकरिता विविध प्रकारच्या वातानुकूलित (एसी), विना वातानुकूलित (नॉन एसी) वाहने भाडे तत्वावर किमान स्थानिक (80 कि.मी./12 तास) तसेच बाहेरील ठिकाणी (300 कि.मी./24 तास) शासकीय वापरासाठी प्रतीमहा दराने एक वर्ष कालावधीसाठी कॉल बेसिस तत्वावर दरत्रके मागविण्यात आली आहेत.

     तरी इच्छुक वाहनपुरवठाधारकानी दि.20 मार्च 2023 दुपारी 3.30  पर्यंत प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, राऊतवाडी, वेश्वी अलिबाग या कार्यालयीन पत्यावर पोस्टाने किंवा हस्तपोच निविदा सादर कराव्यात. तांत्रिक लिफाफा त्याच दिवशी सायंकाळी 4.00 वा. उघडण्यात येईल. (अटी व शर्ती लागू). निविदा दस्तऐवज कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक आत्मा, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक