केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 13 व्या हप्त्याचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न रायगड जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 8 हजार 654 पात्र लाभार्थ्यांना रु.21 कोटी 73 लाख 8 हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत


 

अलिबाग,दि.27(जिमाका) :- केंद्र पुरस्कृत 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आज दि.27 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3.00 वा. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले.  रायगड जिल्ह्यातील अंदाजे 1 लाख 08 हजार 654 पात्र लाभार्थ्यांना रु.21 कोटी 73 लाख 8 हजार इतकी लाभाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

राज्य शासनाकडील दि.15 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता, केंद्र शासनाने सुरु केलेली केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात दि.01 डिसेंबर 2018 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबियांस रु.2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यात एकूण रु.6 हजार प्रती वर्ष लाभ अनुज्ञेय आहे. त्यानुसार रायगड जिल्हयात या योजनेंतर्गत माहे फेब्रुवारी 2019 पासून एकूण 1 लाख 75 हजार 612 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

 केंद्र शासनातर्फे फेब्रुवारी 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 12 हप्त्यांमध्ये रक्कम रु. 2 अब्ज 92 कोटी 42 लाख 92 हजार इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक