आरटीई 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश-2023 ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत पाल्यांची ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु

 

 

अलिबाग,दि.3,(जिमाका):-सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दि.1 मार्च 2023 पासून पाल्यांचे ऑनलाईन अर्ज नोंदणी (Online/Allication Registration) सुरु झाली आहे. इच्छुक अर्जदारांनी शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex, या वेबसाईटवर बालकांचे अर्ज भरावेत.

 प्रवेशासंबंधित पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पंचायत समितीमार्फत मदत केंद्र सुरु करण्यात आली असून केंद्राच्या वेबसाईटवर होम पेज वर हेल्प सेंटर या ऑप्शनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

    प्रवेशासाठी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे : शाळा सर्व मंडळाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित शाळा (अल्पसंख्याक शाळा वगळून).

पात्र अर्जदार-वंचित घटक-व्हीजे, एनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी, अपंग- 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली बालके, दुर्बल घटक- एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले सर्व घटक, विधवा, घटस्फोटित महिलांची बालके, अनाथ बालके, एकाकी पालकांची बालके, आवश्यक कागदपत्रे-(ऑनलाईन अर्ज भरताना कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही. परंतु सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष प्रवेश देताना संबंधित शाळेकडून प्रमाणित केली जातील).

   वंचित घटक-समक्ष अधिकाऱ्याने दिलेले वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, बालकाच्या जन्माचा दाखला, पालकाचा रहिवाशी पुरावा. अपंग-समक्ष प्राधिकाऱ्याने दिलेले 40 टक्के पेक्षा जास्त अपंगात्व असल्याचे प्रमाणपत्र. दुबर्ल घटक- समक्ष अधिकाऱ्याने दिलेले कुटूंबाचे एकत्रित उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र (लगतच्या आर्थिक वर्षाचे) बालकाचा जन्माचा दाखला, रहिवाशी पुरावा. अर्ज करणाऱ्या बालकाचे अलीकडील काळातील पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र.  निवासी पुराव्याकरिता रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इत्यादी यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा. यापैकी पुरावा नसल्यास भाडेकरार ग्राह्य धरण्यात यावा. भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. परंतु भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा.

 जन्माच्या दाखल्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील एएनएमच्या रजिस्टरमधील नोंदीचा दाखला, अंगणवाडी, बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला, आई-वडील अथवा पालकांचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्वयंनिवदेन यापैकी कोणतेही एक दस्त ऐवजाची प्रत सादर करता येईल.

 तरी जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आपल्या पाल्यांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, रायगड श्रीमती पुनिता गुरव यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक