राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत  ग्रामीण व शहरी भागासाठी विहीत केलेल्या कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादेत पात्र लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य दिले जाते. त्यासाठी ग्रामीण भागाकरीता 44 हजार व शहरी भागातील 59 हजार रुपये इतकी वार्षिक उत्पन्न मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. या कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत सामावून घेण्यात येते. या उत्पन्न मर्यादेतील  लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी.
1.)राष्ट्रीय अन्नसुरक्षा मधून धान्य मिळणेबाबतचा अर्ज.
2.) अर्जदार यांच्या कुटूंबातील सर्वांचे आधारकार्ड.
3.) विहीत नमुन्यात हमीपत्र (हमीपत्रावर अर्जदारांचे फोटो लावून सही करणे.)
4.) रेशनकार्ड झेरॉक्स.
5.) बँक पासबुकची झेरॉक्स.
तरी तालुक्यातील जे लाभार्थी सवलतीच्या दराने ध्यान्याचा लाभ घेऊ इच्छित असतील त्यांनी वरील कागदपत्रासह अर्ज तहसिल कार्यालय रायगड अलिबाग या कार्यालयाकडे सादर करावेत.असे आवाहन तहसिलदार अलिबाग-रायगड यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक