पत्रपरिषद ; कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक-2018; मतदानासाठी विशेष रजा; वेळ ही वाढवली- जिल्हाधिकारी यावलकर



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.18- विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची  रायगड जिल्ह्यातील तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. दरम्यान मतदारांना मतदान करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून मतदानाच्या दिवशी (दि.25) विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. तसेच मतदानाची वेळही  दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2018 संदर्भात माहिती देण्यासाठी आज रायगड जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड या उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांनी माहिती दिली की, विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2018 चा कार्यक्रम 24 मे 2018 रोजी भारत निवडणूक आयोग यांनी घोषित केलेला आहे.  कोकण पदवीधर मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या निवडणुकीकरिता एकूण 93 केंद्र असून त्यापैकी रायगड जिल्ह्यात एकूण 36 मतदान केंद्र आहेत. ती  याप्रमाणे
पनवेल- 9,
पेण-3,
अलिबाग-3,
कर्जत व उरण  येथे प्रत्येकी 2  तर इतर ठिकाणी एक-एक केंद्र आहेत.
कोकण पदवीधर मतदार संघाकरिता एकूण पदवीधर मतदार 1 लाख 4 हजार 264 असून त्यापैकी रायगड जिल्ह्यातील एकूण मतदार 19 हजार 918 (पुरुष 11 हजार 934 व स्त्रिया 7 हजार 984) आहेत.  
            या निवडणूकीसाठी     मतदान सोमवार दि.25 जून 2018 रोजी होणार आहे.  मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 (मा.निवडणूक आयोगाच्या दिनाक 13/06/2018 रोजीच्या पत्रान्वये ) आहे. ही वेळ आयोगाने वाढवून दिलेली वेळ आहे. या आधी ती सकाळी 8 ते दुपारी चार वा. पर्यंत अशी होती.


मतदानासाठी विशेष रजा
पदवीधर मतदारांना मतदान करण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 23 जून 2011 च्या शासन निर्णयान्वये निवडणूकीच्या पदवीधर मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आलेली आहे.  सदरची रजा ही कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
मतमोजणी  दि.28 रोजी नेरुळ येथे
मतदान साहित्य मतदान संपल्यानंतर आधी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्रितरित्या जमा करुन तेथून नेरुळ येथील मतमोजणी ठिकाणी (आगरी-कोळी संस्कृती भवन) जमा करण्यात येणार आहे. मतमोजणी दि.28 रोजी होणार आहे.
संनियंत्रण कक्ष स्थापन
कोकण पदवीधर मतदार संघाकरिता रायगड जिल्ह्यातील विविध तक्रार निवारण करण्याकरिता तक्रार सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक 02141-224131 असा आहे.
राजकीय पक्षांसाठी एक खिडकी कार्यान्वित
विविध राजकीय पक्षांना निवडणुकीकरिता लागणाऱ्या विविध परवानगी ह्या एकाच ठिकाणी देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक