आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- रायगड जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, म्हसळा आगरवाडा येथे संस्थेचे संधाता,नळकारागिर, कर्तन व शिवण  आणि दोन वर्ष व्यवसाय अभ्यासक्रमाचे विजतंत्री, इलेकट्रॉनिक्स् मॅकॅनिक व जोडारी या व्यवसायांतील ऑगस्ट-2018  सत्र  प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया दि. शुक्रवार दि.1 जुन पासून सुरु झाली असून ते बुधवार दि.20 जुन पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या वेळात जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हसळा येथे अर्ज सादर करावेत.
तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावेत आहे.  तसेच माहितीपुस्तक ऑनलाईन उपलब्ध आहे. असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था-म्हसळा जि.रायगड यांनी केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक