केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते हे बुधवार दि.20 रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
बुधवार दि.20 रोजी सकाळी 11 वा.पेण येथे आगमन. दुपारी साडे बारा वा. पेण येथून अलिबागकडे प्रयाण. दुपारी दीड वा. अलिबाग येथे आगमन. सायं. साडे चार वा. अलिबाग येथून रोहा कडे प्रयाण. सायं. साडेपाच वाजता रोहा येथे  आगमन. रात्री नऊ वा. रोहा येथून महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे कडे प्रयाण. 
गुरुवार दि.21 रोजी  सकाळी साडेसात वा.महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे  येथून  राठी इंग्लिश स्कुल, रोहा कडे प्रयाण.सकाळी आठ वाजता अंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त राठी इंग्लिश स्कुल, रोहा येथे आगमन. सकाळी पावणे नऊ वा. राठी इंग्लिश स्कुल रोहा कोलाड येथून प्रयाण. सकाळी सव्वा नऊ वा.  महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे जि.रायगड येथे आगमन. सकाळी साडे अकरा वा. महाराष्ट्र सिमलेस,सुकेळी नागोठणे जि.रायगड येथून अलिबागकडे प्रयाण. दुपारी एक वा. अलिबाग येथे आगमन.दुपारी तीन वा. अलिबाग येथून पालीकडे प्रयाण. सायं. चार वा. पाली येथे आगमन. सायं. साडेपाच वा. पाली येथून मुंबईकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड