शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे प्रवेश प्रक्रिया सुरू

 

रायगड (जिमाका)दि.04: वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड यामध्ये सन २०२५ साठीची प्रवेश प्रक्रिया दि. 15 मे 2025 पासून Online पद्धतीने सुरू झाली आहे. यासंदर्भातील सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतची प्रमाणित कार्यपद्धतीची माहितीपुस्तिका http://www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर Online स्वरूपात उपलब्ध आहे:

इच्छुक उमेदवारांनी 10  वी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण असले तरीही दि.15 मे 2025 पासून Online पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावा. प्रवेश घेतलेल्या पात्र प्रशिक्षणार्थ्यांना नियमानुसार दरमहा रु. 500 इतके विद्यावेतन दिले जाईल.

विशेष सुविधा:इ. 10 वी व 12 वी समकक्षतेची सोयख्‍पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेशाची संधी

प्राचार्य यांनी सूचित केले आहे की, उमेदवारांनी खालील बाबी विहित वेळेत पूर्ण कराव्यात प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे, व्यवसाय पसंती निवडणे.

अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर व्यवसायाची पसंती सादर करावी.

व्यवसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरीत रोजगार / स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करण्यासाठी प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेणे अत्यंत उपयुक्त ठरेल.

प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसाय-एक वर्ष कालावधीसाठी:संघाता (Welder) – 40 जागा,विजतंत्री (Electrician) – 20 जागा,दोन वर्ष कालावधीसाठी:, जोडारी (Fitter) – 20 जागा,कातारी (Turner) – 20 जागा,यंत्रकारागिर (Machinist) – 20 जागा, यांत्रिक मोटारगाडी (Mechanic Motor Vehicle) – 24 जागा, तारतंत्री (Wireman) – 20 जागा, अटेंडन्ट ऑपरेटर केमिकल प्लँट (AOCP) – 48 जागा,  मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लँट (MMCP) – 40 जागा,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लँट (IMCP) – 20  जागा अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी  http://www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

०००००००

Comments

Popular posts from this blog

भारतीय संविधान -आमचा अभिमान

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

अवयवदान - काळाची गरज