दि.06 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन माजी प्रशिक्षणार्थी,त्यांचे पालक,नागरिकांनी उपस्थित रहावे,
रायगड(जिमाका)दि.04:- वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,महाड येथे दि.06 जून 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. एन. एस. पुरकर यांनी केलेआहे.
या कार्यक्रमासाठी स्थानिकआमदार, लोक प्रतिनिधी, पत्रकार व इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. सदरील कार्यक्रम सोहळयाचे उदघाटन मुख्यमंत्री महोदयांचे हस्ते Online पध्दतीने करण्यात येणार आहे.
००००००
Comments
Post a Comment