महाराष्ट्र शासनाच्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याच्या कालावधीस मुदतवाढ

 

अलिबाग,दि.2(जिमाका):- मराठी भाषेतील उत्कृष्ट बाय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वा पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका पूर्वीच्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 01 जानेवारी ते दि.31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके सादर करण्याच्या कालावधीस एक महिना अधिकची मुदतवाढ देण्यात येत असून आता या पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 02 मार्च 2023 हा राहील.

दि. 01 जानेवारी 2022 ते दि.31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश' या सदरात स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2022 Extension of period for sending Books and Application Form शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 02 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक/प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतीसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सवानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दि. 02 मार्च 2023 पर्यंत पाठवावे, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.

लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना ते बंद लिफाफ्यावर/पाकीटावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 02 मार्च 2023 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (दि. 02 मार्च 2023) येणाऱ्या प्रवेशिका स्पयंसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक