संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षा पूर्वतयारी अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा


 

अलिबाग,दि.1(जिमाका):- संयुक्त संरक्षण सेवा (CDS) परीक्षेची तयारी करण्यासाठी, महाराष्ट्र शासनातर्फे संयुक्त संरक्षण सेवा (CDS) अभ्यासक्रम क्रमांक 60 हा महाराष्ट्रातील तरुण-तरुणींसाठी प्री-कॅडेट प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 01 फेब्रुवारी ते दि.9 एप्रिल 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन व प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, प्री-कॅडेट प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे फोन नंबर 0253-2451032, 09130271626 या क्रमांकावर संपर्क साधावा, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक