भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाईन तयार

 


 

अलिबाग,दि.2(जिमाका):- मागील काही दशकांमध्ये भारतातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सातत्याने वाढत आहे. आकडेवारीवरून असे दिसून येते की, ही वाढ एक मोठी आवाहन ठरणार आहे.  अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील जेष्ठांना विशेष सेवा पुरवण्यासाठी नवीन मॉडेल्सची आवश्यकता आहे, याचसाठी सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय हेल्पलाईन (ELDERLINE-14567) सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी नॅशनल इम्प्लीमेंटीग ऐजन्सी (NIA), राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था (NISD), सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय भारत सरकार, सामाजिक न्याय व विशेष साह्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन व जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून आपल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी जेष्ठ नागरीक राष्ट्रीय हेल्पलाईन-14567 (NATIONAL HELPLINE FOR SENIOR CITIZENS-14567 सुरु आहे.

राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन महाराष्ट्र राज्य म्हणून श्री.स्मितेश शहा हे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. श्रीमती रेखा आनंद (टीम लीडर), श्री.हणमंत धुमाळ (टीम लीडर) म्हणून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागिरकांपर्यंत पोहोचण्यासाठी समन्वय साधतात आणि श्री.सत्यपाल लोणे ( फील्ड रिस्पॉन्स ऑफिसर) म्हणून पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी कार्यरत आहेत.

राष्ट्रीय हेल्पलाईनचा उद्देश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्यासाठी व इतर सेवांसाठी वेळोवेळी आपल्या सहकार्याची गरज भासणार आहे.

राष्ट्रीय हेल्पलाईन संबंधी माहिती:- राष्ट्रीय हेल्पलाईन ही वयोवृद्ध व्यक्तींसाठी असून महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फौंडेशनद्वारे चालवली जात आहे. हेल्पलाईन टोल फ्री नंबर - 14567 आहे. हेल्पलाईन ची वेळ सकाळी 8.00 वा. ते रात्रौ 8.00 वा. असेल व वर्षातील 365 पैकी 361 दिवस सुरू राहणार आहे. (दि.26 जानेवारी, दि.15 ऑगस्ट, दि.2 ऑक्टोबर आणि दि.1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी सुट्टी असते).

 या हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा पुढीलप्रमाणे :-

माहिती- आरोग्य जागरूकता, निदान, उपचार निवारा/ वृद्धाश्रम घरे, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक इत्यादी,  

मार्गदर्शन- कायदेविषयक (वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर दोन्ही), विवाद निराकरण (मालमत्ता, शेजारी इ.), आर्थिक, पेन्शन संबंधित  सरकारी योजना इत्यादी,

भावनिक आधार देणे- चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, जीवन व्यवस्थापन (वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ.),

क्षेत्रीय पातळीवर मदत- बेघर, अत्याचार ग्रस्त वृद्ध,, ज्येष्ठ हरवलेले व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी इत्यादी,  या हेल्पलाईनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय अधिकारी (FRO) नियुक्त करण्यात आले आहेत. या हेल्पलाईन 14567 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणे, जेणेकरुन वृद्ध व्यक्तीची योग्य ती मदत करून त्यांची काळजी घेता येईल, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड