शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

 


 

अलिबाग,दि.2(जिमाका):-शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान केले जातात.

पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि.16 जानेवारी ते दि.30 जानेवारी 2023 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर व स्पर्धा यासाठी अर्ज करण्यास पुरेशा कालावधी न मिळाल्याने पुरस्कार अर्ज सादर करण्यास 20 दिवसांची मुदतवाढ मिळावी, यासाठी राज्यातील विविध क्रीडा संघटना व खेळाडूंनी शासनास विनंती केली होती. त्यानुसार शासनाने विनंतीचा व वस्तुस्थितीचा सर्वकष विचार करुन दि.20 फेब्रुवारी 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.

साहसी क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा  कालावधी त्या पुरस्कार वर्षातील दि.30 जून रोजी संपणाऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल.

पुरस्कारासाठी अर्जाचे नमुने, शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या करण्यासाठी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्या मधील लिंकवर पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक