“महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम” (भाग-1)

 

 

आरोग्य सेवांचा मूळ उद्देश आरोग्य सुधारणे हा असून, लोकांचे जीवनमान सुधारावे व निरोगीपणे जगता यावे यासाठी, आरोग्य शिक्षण व सेवा यावर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा ही सामाजिक आरोग्य क्षेत्र, यात प्राथमिक आरोग्य सेवा, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचाही समावेश होतो. या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवांची उपलब्धता करून देण्यात येते. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून शासनाच्या वतीने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखण्यात आलेल्या आहेत. या आरोग्य सेवा अधिकाधिक लोकाभिमुख झाल्यास लोकांना चांगले आरोग्य लाभून समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.

सामाजिक क्षेत्राबरोबरच स्वयंसेवी संस्था व खाजगी क्षेत्र या माध्यमातून अंगीकृत रुग्णालयातून आपल्या सेवा या देत असतात, त्या सेवांशीही शासन सामाजिक आरोग्य क्षेत्राशी जोडण्याचा प्रयत्न करीत आलेले आहे. निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने विविध महाआरोग्य योजना सामान्य माणसासाठी शासनाच्या वतीने साकारलेल्या आहेत.  या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन लोकांनी त्याचा अधिकाधिक उपयोग घेण्यासाठी व त्या लोकाभिमुख करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे, यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांचेदेखील मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे, असे मनोगत आरोग्य सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या संचालक, डॉ.साधना तायडे तसेच आरोग्य सेवा, पुणे चे संचालक, डॉ.नितीन अंबाडेकर यांनी नोव्हेंबर-2022 च्या महाराष्ट्र आरोग्य पत्रिकेच्या महाआरोग्य योजना-सार्वजनिक आरोग्य योजना व कार्यक्रम या विशेषांकातून व्यक्त केले आहे. या पुस्तिकेचे संपादन डॉ.कैलास बाविस्कर यांनी केले आहे.

चला तर जाणू घेवूया…काय आहेत या आरोग्य योजना, काय आहेत या योजनांचे लाभ ….

माहेरघर योजना

राज्यामध्ये अनेक आदिवासी पाड्यांमध्ये डोंगराळ भाग असून अवघड रस्ते असल्यामुळे बाळंतपणासाठी मातांना वेळेवर आरोग्य संस्थेमध्ये पोहोचणे अडचणीचे होत असल्यामुळे, गरोदर मातांना बाळंतपणाच्या आधी 4 ते 5 दिवस आरोग्य संस्थेमध्ये भरती करून माहेरघर योजनेव्दारे सर्वंकष सेवा दिली जाते. त्याचप्रमाणे बहुतांश आदिवासी भागात दूरध्वनी नेटवर्कच्या अभावामुळे रुग्णवाहिका वेळेवर मिळणे अवघड होते.

योजनेचे स्वरुप-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात 9 जिल्ह्यातील 90 प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बनविण्यात आली होती.  सद्य:स्थितीत 78 माहेरघर कार्यान्वित आहेत.  महत्त्वाचे ध्येय, योजनेतील बाबी व त्या साध्य करण्याची पद्धती, माहेरघर योजनेमुळे डोंगराळ व आदिवासी भागातील मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने माहेरघर योजना प्रभावी ठरत आहे.

माहेरघरामध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा-

v  मातेच बाळंतपण सुरक्षित व वैद्यकीय संस्थामध्ये होण्याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्भवती महिला प्रसूतीपूर्वी 4 ते 5 दिवस अगोदर भर्ती करण्यात येते.

v  गर्भवती महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून नियमित तपासणी करण्यात येते आणि तपासणी दरम्यान गुंतागुंत आढळल्यास तिला जवळच्या आरोग्य संस्थेत संदभीत करण्यात येते.

v  माहेरघरामध्ये गर्भवती महिला, तिचे लहान मूल व एक नातेवाईक यांची राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.

v   माहेरघरांची देखभाल ठेवण्यासाठी व गर्भवती महिला, तिचे लहान मूल न एक नातेवाईक यांना भोजनाची सोय करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत महिला स्वयंसहाय्यता गट किंवा दारिद्रय रेषेखालील निवड करण्यात आली आहे.

v  तसेच, आहार व माहेरघराची स्वच्छतेकरिता महिला स्वयंसहाय्यता बचतगट किंवा दारिद्रयरेषेखालील कुटुंबास प्रत्येक लाभाच्या मागे प्रतिदिन रु 300/- या दराने अधिकतम 4 दिवसांकरिता अदा करण्यात येते.

v  तसेच गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन रु 200 अधिकतम 4 दिवसांकरिता अदा करण्यात येतात.

 आशा स्वयंसेविका योजना

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागृकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने 'आशा स्वयंसेविका' महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे.

आशा ही गावातील स्थानिक रहिवासी असल्याने व तिला स्थानिक भाषा अवगत असल्याने गावाच्या आरोग्य विषयक अडचणी समजून घेण्यास व नेतृत्व करुन गावपातळीवरील समत्वा सोडविण्याकरिता आशा स्वयंसेविकेकडून महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे. आशा स्वयंसेविका योजनेची अमंलबजावणी 34 जिल्हयांतील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात करण्यात येत आहे.

 मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प

प्रकल्प ओळख-मोबाईल मेडिकल युनिट सेवा अनोखा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवांपासून वंचित लोक राहतात,अशा लोकांना आरोग्याच्या सेवा देत आहेत. ही फिरती रुग्णालये ही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालविण्यात येतात. सर्व जिल्ह्यांमधील मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पासाठी दुर्गम आणि अतिदुर्गम (Unserved Underserved) भागांची निवड करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 याप्रमाणे 33 जिल्ह्यांसाठी 33 युनिट आणि नंदुरबार गोंदियासाठी अधिक प्रत्येकी 2 आणि गडचिलीसाठी 3 असे एकूण 40 युनिट आहेत. आजपर्यंत 32 स्वयंसेवी संस्थांची निवड मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत पालघर, परभणी, रायगड, सातारा, नांदेड व नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये रुग्ण कल्याण समितीमार्फत प्रकल्प सुरु आहे. या जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांची निवड करण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे.

 प्रकल्पाची उद्दिष्टे :-

v  राज्यातील ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवांपासून वंचित व अर्धवंचित लोकांना प्राथमिक, प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आणि संदर्भ आरोग्य सेवा त्यांच्या गावामध्ये पुरविणे.

v  अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवांसह निदानात्मक सुविधा पुरविणे.

v   मिल्येनियम डेव्हलेपमेंट गोल्सच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये सुधारणा करण्याकरिता समन्वय साधणे.उदा.बालमृत्यू, मातामृत्यूदरात घट, आर्युमानवृध्दी इत्यादी फिरते वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र स्वरुपाच्या आरोग्य सेवा व संदर्भ सेवा देणे.

मोबाईल मेडिकल युनिटद्वारे उपचारात्मक आरोग्य सेवा, प्राथमिक उपचार,संदर्भसेवा, कुटुंबनियोजन,लसीकरण, साथीचे रोग नियंत्रणात्मक कार्यक्रम समुपदेशन, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी, आरोग्य व परिसर स्वच्छता याबाबत लोकजागृती, प्रसूतीपूर्व व प्रसू तीपश्चात माता व बालसंगोपन या सेवा पुरविण्यात येतात

या लेखांविषयी आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय arogyapatrikamh@gmail.com या ई-मेलवर तसेच पत्रव्यवहारासाठी मुख्य संपादक, महाराष्ट्र आरोग्य पत्रिका तथा उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, परिवर्तन, आरोग्य भवन परिसर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे-411006 येथे संपर्क साधावा.


      मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक