“चला बोलू करिअर वर” या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

 


 

अलिबाग,दि.30 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात येतात. सध्याच्या स्पर्धेच्या युगात योग्य नोकरी कशी मिळवावी, नोकरीसाठी अर्ज करताना कसा व कुठे करावा या सगळ्या प्रश्नांचे निरसन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग यांच्या वतीने चला बोलू करिअर वर या विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन सत्र दि.31 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता https://meet.google.com/sqr-ytej-cox, या गुगल मिट प्लॅटफॉर्म वर आयोजित केले आहे.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रांतर्गत या सत्रामध्ये ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता कार्यालयाचे यंग प्रोफेशनल, श्री.आशुतोष साळी हे सहभागी उमेदवारांना 12 वी/पदवी नंतर कोणता मार्ग निवडावा?, स्व-परिचयपत्र (Resume, CV, Bio Data) कसा बनवावा? मुलाखतीची तयारी कशी करावी? अशा नोकरीसंबधी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सहभागी व्हावे व तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक