दिवाळी सणानिमित्त आयोजित प्रदर्शन उदघाटन संपन्न


रायगड  दि.4-- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत श्रीवर्धन, तळा,रोहा तालुक्यात आयोजित दिवाळी सणानिमित विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे  यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

      श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पचेतन  व श्रीवर्धन तालुक्यात पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात त्याच प्रमाणे तळा तालुक्यांतील मुख्य बाजार पेठेत आणि रोहा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात अश्या चार ठिकाणी हे प्रदर्शन सुरु आहे. ८० स्वयंसहायता समूहांनी या मध्ये सहभाग घेतला आहे.  दिवाळी फराळ,पणत्या, कंदील,विविध प्रकारचे मसाले व विविध प्रकारचे लाडू काजूगर ,नाचणी लाडू, खजूर लाडू इमिटेशन ज्वेलरी, रेडीमेड ड्रेस मटेरियल, साडीज मातीची भांडी, इत्यादी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेले आहेत.  

     यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री कु अदिती तटकरे यांनी सांगितले, पुढील काळात महीला स्वयं सहाय्यता समुहाच्या उत्पादनासाठी कायम स्वरूपी विक्री साठी तसेच ऑनलाइन पद्धतीने वस्तूची विक्री करण्यासाठी महिलांना प्रोसाहित करण्यात येईल असे सांगितले. 

      या कार्यक्रमास श्रीमती प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड , श्री.सिद्धेश चंद्रकांत राऊळ, जिल्हा व्यवस्थापक, उमेद,श्री. गट विकास अधिकारी श्रीवर्धन ,तळा आणि रोहा श्री. अशोक चव्हाण, जिल्हा समन्वयक, अधिकारी, महाविम प्रभाग संघाचे पदाधिकारी, ग्राम संघाचे पदाधिकारी,महीला

स्वयं सहाय्यता समूहातील महीला मोठया प्रमाणावर उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक