सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग क्षेत्राच्या समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य --मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड उद्योजकांसाठी एमएसएमई विकासावरील कार्यशाळा संपन्न

 

 

रायगड(जिमाका),दि.8:- राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणेसाठी सुक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्राधान्य देत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी केले.  

 अलिबाग येथे  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज IGNITE Maharashtra या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उज्ज्वला बाणखेले,  जिल्हा कौशल्य विकास अधिकारी अमिता पवार, बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक मुकेश कुमार,  अग्रीम बँक व्यवस्थापक विजय कुलकर्णी,  रायगड अलिबाग जिल्हा निर्यात प्रचालन समिती सचिव तथा महाव्यवस्थापक जी एस हराळ्या यासह जिल्हयातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       उद्योगाच्या विकासाकरीता सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांच्या सहकार्याने  कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

               महाव्यवस्थापक श्री हराळ्या यांनी बोलताना आज या कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नव उद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समुह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रीया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातीसंबंधी कामकाज करणारे घटक, संशोधक, बँक इत्यादींना आमंत्रित करण्यात आलेले आहे, असे सांगितलेे. 

     उद्योग संचालनालयामार्फत राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी उद्योजकांसाठी उपक्रम व योजना राज्यात राबवत आहे.  राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग समन्वयाने ही अंमलबजावणी केली जात आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक