जिल्ह्यातील माजी सैनिकांचे अभिलेख्यामधील कुणबी नोंदीच्या तपासणीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

 

 

            रायगड(जिमाका)दि.9:-रायगड जिल्हयामधील सर्व सेवानिवृत्त सैनिकी अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, वीधवा, वीर माता,  वीर पिता, वीर पत्नी व अवलंबीतांना आपल्या जवळ असलेल्या शैक्षणिक  कागदपत्रांमध्ये तसेच सैन्यामधील अभिलेख्यांमध्ये हिंदू मराठा कुणबी या जातीच्या नोंदीबाबत काही उल्लेख आढळून आल्यास दि. 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 02141-222208 वर त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गोविंदराव साळूंखे यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक