महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे दिवेआगार येथे सुपारी संशोधन (विस्तारित) केंद्र केंद्रासाठी २ हेक्टर जमीन, ५ कोटी ६४ रुपये खर्चास मान्यता

 

रायगड (जिमाका) , दि .७:--  जिल्हयामधील श्रीवर्धन आणि नजीकच्या तालुक्यामधील सुपारी हे अत्यंत महत्वाचे व व्यापारी तत्वावर घेण्यात येणारे नगदी बागायती पीक आहे. या पिकास प्रोत्साहन देण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत सुपारी संशोधन (विस्तारित) केंद्र निर्माण करण्याची मागणी केली होती. त्याच्या प्रयत्नांमुळे श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे २ हेक्टर जमीनीवर विस्तारित केंद्रास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच ५ कोटी ६४ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 


सुपारी संशोधन विस्तारित केंद्राबाबत कृषि मंत्री धनंजय मुंडे  यांचे अध्यक्षतेखाली व  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत  बैठक झाली होती. या बैठकीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार येथे सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली.


डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत दिवेआगार येथील सुपारी संशोधन केंद्र निर्मितीमुळे 

सुपारी पिकावरील संशोधनास चालना मिळेल. सुपारीच्या बुटक्या, तसेच, दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या बरोबरच दिवेआगार, श्रीवर्धन परिसराचे हवामान आणि जमीन विचारात घेवून अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या पिकाची आंतर पीक पध्दती विकसीत करण्यासाठी संशोधन कार्य केले जाणार आहे.


या परिसरामध्ये होणारी सुपारीही वैशिष्टपूर्ण असून भौगोलिक मानांकनास पात्र आहे. या केंद्रामुळे रोजगार निर्मिती होऊन शेती उत्पन्नातही वाढ होऊन परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक