विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रयोजनासाठी: अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत देण्याकरीता विशेष मोहिम


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  शैक्षणिक प्रयोजनासाठी (विशेषत: वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी व सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र त्वरीत मिळावे यासाठी विशेष मोहिम आखण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  e-ribe पोर्टलवर https://etribevalidity.mahaonline.gov.in  ऑनलाईन अर्ज केल्यानंतर प्राधान्याने वैधता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे,असे सहआयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,कोकण विभाग,ठाणे यांनी कळविले आहे.
 यासंदर्भात या समितीच्या पोलीस दक्षता पथकास देखील गृह व शालेय चौकशीची व कागदपत्रांची पडताळणी  करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था,पुणे येथे हेल्पलाईन व 020-26360941 सुरु करण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत अनुसूचित जमातीच्या जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैधता प्रमाणपत्रांच्या अनुषंगाने विशेष कक्षामार्फत आवश्यक ती माहिती पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. तसेच समितीस्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरध्वनी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपर्क दूरध्वनी याप्रमाणे- (कार्यक्षेत्र ठाणे,मुंबई,मुंबई उपनगर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग व पालघर जिल्हे) 022-25883503. अधिक माहितीसाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,कोकण विभाग,ठाणे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,कोकण विभाग,ठाणे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक