जिल्हा रुग्णालयात दर महिन्याच्या 21 तारखेला ‘योग’मार्गदर्शन-डॉ. गवळी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- योग दिवस हा एक दिवसाचा सोहळा न राहाता लोकांना जास्तीत जास्त् फायदा मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 21 तारखेला सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे निरनिराळ्या व्याधींवर उपचार म्हणून योग मार्गदर्शन दिले जाईल, या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत आयुष विभागाद्वारे जागतिक योग दिनानिमित्त  जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग येथे योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्य् चिकित्सक, डॉ.अनिल फुटाणे,अति.जिल्हा शल्यचिकित्सक,डॉ.अमोल भुसारे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क), जिल्हा आयुष अधिकारी डॉ.चेतना पाटील, डॉ.अर्चिस पाटील व डॉ.वैशाली पाटील,आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी, डॉ.रश्मी गंभीर, होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग मार्गदर्शक दामोदर पाटील व स्मिता देवळे, सामान्य रुग्णालयातील प्रशिक्षिका सौ.सीमा रेजा,आयुष सहाय्यक रुपेश पाटील व दिपाली म्हात्रे तसेच जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त  अधिकारी, कर्मचारी व परिचर्या विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जागतिक योगदिनानिमित्त योग जनजागृती  अभियान दि. 13 ते 21 दरम्यान जिल्हयातील निरनिराळया ठिकाणी राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी मार्गदर्शन केले.
या अभियानांतर्गत मोठ्या संख्येने विद्यार्थी, सर्वसामान्य जनता तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रबोधनासाठी योगा अभ्यासासंबंधी विविध व्याख्याने व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. तसेच दि. 14 व 17 रोजी एसओएस व्हिलेज व आयुष विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तिनवीरा व सोगाव  अलिबाग येथील मुलांसाठी योगाभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
 जिल्हा कारागृह येथेही अधिकारी, कर्मचारी,कैदी यांना मार्गदर्शन करण्यात आले. तर डॉ.चेतना पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक