जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 33मि.मि.पावसाची नोंद



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-  रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 33.24 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 891.65  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 38.00 मि.मि., पेण-60.20 मि.मि., मुरुड-17.00 मि.मि., पनवेल-19.40 मि.मि., उरण-15.20 मि.मि., कर्जत-66.60 मि.मि., खालापूर-61.00 मि.मि., माणगांव-31.00 मि.मि., रोहा-19.00 मि.मि., सुधागड-30.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-40.00 मि.मि., पोलादपूर-22.00, म्हसळा-37.20मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-45.50 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 531.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 33.24मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 29.53 % इतकी आहे.
तसेच रविवार दि.1 व सोमवार दि.2 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने दिला आहे.
००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक