जिल्हा माहिती कार्यालयातील अशोक महादेव मोरे सेवानिवृत्त



            अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-   जिल्हा माहिती कार्यालय रायगड-अलिबाग या कार्यालयातील रोनिओ ऑपरेटर अशोक महादेव मोरे हे नियत वयोमानानुसार शनिवार दि. 30 जून, 2018 रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांना जिल्हा  माहिती कार्यालयातर्फे स्नेहपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती)डॉ.गणेश मुळे  यांच्या हस्ते श्री.मोरे यांना सपत्नीक शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
            डॉ.गणेश मुळे यांनी श्री.मोरे यांच्या 38 वर्षाच्या सेवेचे कौतुक करून त्यांना भावी  वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
            श्री. मोरे यांनी आपल्या मनोगतात सेवा काळातील आठवणी सांगून सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, कर्मचारी सर्वश्री विभागीय माहिती कार्यालयाचे लेखापाल गंगाराम बांगरा,  लिपिक टंकलेखक श्री. सचिन काळुखे, लिपिक टंकलेखक श्रीमती निशा चंद्रकांत कदम, सिनेयंत्रचालक श्री. धनजंय कासार, श्री.जितेंद्र यादव, श्री.सचिन राऊत, श्री.शशिकांत भोसले  तसेच श्री.मोरे यांच्या पत्नी सौ.अपर्णा मोरे उपस्थित होत्या.   
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक