सामाजिक समता दिन सोहळा: छत्रपती शाहू महाराजांनी रचला सामाजिक समतेचा पाया : निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांचे प्रतिपादन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26-  ब्रिटीश राजवटीत सुद्धा आपल्या कोल्हापुर संस्थानात  समाजातील दुर्बल घटकांसाठी न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी  अस्पृश्यता निवारण, शिक्षण, आरक्षण यासारख्या धोरणांची अंमलबजावणी करुन राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया रचला, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज येथे केले.
 राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण रविकिरण पाटील , तहसिलदार लोखंडे तसेच अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थि विद्यार्थिनी उपस्थित होते.
 कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.  आपल्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी पाणबुडे म्हणाले की, महाराष्ट्र ही छत्रपती शाहू, महात्मा जोतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांची भूमी. त्यामुळेच आज आपले राज्य हे प्रागतिक राज्य म्हणून ओळखले जाते.  या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करत असतांना आपण आज ज्या ज्या क्षेत्रात काम करतो, ज्या अधिकार कक्षेत काम करतो तेथून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका आपण बजवावी असे आवाहन त्यांनी केले.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रविकिरण पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन स्वाती पवार हिने तर आभार प्रदर्शन समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांनी केले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक