13 कोटी वृक्ष लागवड मौजे कार्ला येथे रविवारी मुख्य कार्यक्रम



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29-  राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम अंतर्गत रायगड जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम मौजे कार्ला, कं.नं. 160, ता.अलिबाग येथे रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अदितीताई तटकरे, लोकसभा सदस्य खा.श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,      आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. धैर्यशिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. अवधुत तटकरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, व उप वनसंरक्षक मनिष कुमार यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक