कृषिदिनानिमित्त आज प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30-  हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतरावजी नाईक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांच्या जयंती निमित्त दि. 1 जुलै, रोजी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद रायगड व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा कै.ना.ना.पाटील सभागृह जिल्हा परिषद रायगड,अलिबाग येथे रविवार दि. 1 जुलै रोजी सकाळी 11 वा. आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष कु. आदितीताई तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली,  तर बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड ना.रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते, लोकसभा सदस्य खा.श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य  आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. निरंजन डावखरे,      आ. बाळाराम पाटील, आ. अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य आ. सुभाष पाटील, आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. धैर्यशिल पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. अवधुत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, शिक्षण व क्रीडा व आरोग्य सभापती नरेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती उमा मुंढे, समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे, विरोधीपक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, कृषि समिती सदस्य रायगड जिल्हा परिषद महादेव दिवेकर, श्रीमती सुप्रिया गोवारी, श्रीमती दिपीका दरेकर, सुधाकर घारे, श्रीमती आरती मोरे, रविंद्र पाटील, राजेश पानवकर, संजय कचरे, श्रीमती निता घाटवळ आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे,असे आवाहन कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध विकास सभापती राजिप प्रमोद पाटील, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप प्रकाश खोपकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, प्रभारी कृषि विकास अधिकारी राजिप मच्छिंद्र भालेराव, प्रकल्प संचालक आत्मा मंगेश डावरे यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक