साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी प्रस्ताव मागविले



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी  अभ्यासक्रमांत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांना  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती दिली जाते. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती साठी महामंडळाकडून सरासरी 60%पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज मागविण्याची अंतिम मुदत मंगळवार दि.10 जुलै 2018 रोजी पर्यंत आहे. आलेल्या प्रस्तावांतून जेष्ठता  व गुणक्रमांकानुसार शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता दहावी व बारावी पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्याने गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला ,उत्पन्न दाखला, रेशनकार्ड, शाळेचा दाखला, मार्कशीट,2फोटो पुढील वर्गात प्रवेश घेतल्याचा पुरावा इ.सह दोन प्रतीत आपल्या पूर्ण पत्त्यासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,विकास महामंडळ (मर्या.),डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,मराठी शाळेच्यामागे, गोंधळपाडा, रायगड अलिबाग या पत्त्यावर अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक,साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे, विकास महामंडळ(मर्या.) अंगत लिंबाजी कांबळे, यांनी केले आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक