राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना: शिधा पत्रिका व आधार कार्ड झेरॉक्स जमा करण्याचे आवाहन



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय यांच्या शासन निर्णयानुसार 30 एप्रिल 2018 अखेर आधार संलग्नता  करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत लाभ देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शासन निर्णयातील निर्देशानुसार स्वलतीच्या दराने लाभ घेत असलेल्या व घेऊ इच्छित असलेल्या  शिधापत्रिकाधारकांनी  या शासन निर्णयासोबत दिलेले हमीपत्र संबंधित शिधावाटप अधिकारी किंवा तहसिलदार यांच्या कार्यालयात जमा करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. ही कार्यवाही करतांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा  योजनेअंतर्गत केंद्र शासनाने ग्रामीण भागाकरीता विहीत केलेली  कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रक्कम रुपये 44 हजार आणि शहरी भागाकरीता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रक्कम रुपये 59 हजार च्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. तरी सर्व शिधापत्रिकाधारकांनी  आपल्या  शिधापत्रिकेची छायाप्रत, कुटुंबातील सदस्यांच्या आधारकार्डच्या छायाप्रती आपल्या संबंधित तहसिलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेत जमा करावी, शासनाकडून प्राप्त होणाऱ्या हमीपत्रातही आपली स्वतःची माहिती साक्षांकित करुन द्यावी, त्यानंतर अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत सवलतीचा लाभ दिला जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी एल.एम दुफारे यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक