पेण तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार--मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील


 

अलिबाग,दि.16(जिमाका):- पेण तालुक्यातील ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या पाच आदिवासी वाड्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या आदिवासी वाड्यांवर रस्ता तसेच पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व पेण गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी दिली आहे.

पेण तालुक्यातील तांबडीवाडी, काजूचीवाडी, खौसावाडी, केळीचीवाडी, उंबरमाळ या आदिवासी वाड्यांवरील नागरिकांना विविध मूलभूत सुविधांची वानवा जाणवत होती. यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ठोस पाऊले उचलण्यात आली आहेत.

या वाड्यांकरिता रस्ता बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने 60 लाख रुपये निधीला तदर्थ मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत उपविभाग पेण बांधकाम अभियंता यांच्या कार्यालयामार्फत अंदाजपत्रक तयार करुन अंतिम प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. तसेच या वाड्यांकरिता जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. यासाठी 1 कोटी 26 लाख 10 हजार 102 रुपयांचा निधी मंजूर असून, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिले आहेत. यामुळे या वाड्यांवरील नागरिकांना भविष्यात चांगला रस्ता व मुबलक  पाणी मिळणार आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक