छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 पर्यंत मुदत

अलिबाग,(जिमाका)दि.13- शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज  दि.15 सप्टेंबर पर्यंत भरणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा रायगड रायगड जिल्ह्यामध्ये महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टल,समुदाय सेवा केंद्र, तहसिल कार्यालय, पंचायत समिती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या सर्व शाखेत विनामूल्य् सुविधा उपलब्ध आहे.अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2017 पर्यंत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपले अर्ज संबंधित केंद्रावर तात्काळ भरावयाचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेतले आहे,अशा शेतकऱ्यांनी आपल्या शाखेशी संपर्क साधून ई-सेवा केंद्रांवर आपला अर्ज भरावा.

शेतकरी बांधवांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतीत आपले अर्ज भरणा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी व पांडुरंग खोडका,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,रायगड   यांनी  केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक