जिल्ह्यात पावसाने ओलांडली सरासरी

        अलिबाग,(जिमाका)दि.15- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 42.54 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली.   जिल्ह्याच्या पर्जन्यमानाची सर्वसाधारण सरासरी ही 3142.64 मि.मी. इतकी असून आज नोंदविण्यात आलेल्या सरासरी  पर्जन्यमानामुळे ही सरासरी ओलांडून 3179. 20  मि.मी.  इतकी झाली आहे. तर एकूण पावसाची टक्केवारी 101.16% झाली आहे.
 आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 58.00 मि.मी, पेण-22.00 मि.मी., मुरुड-16.00 मि.मी., पनवेल-42.60 मि.मी., उरण-18.00 मि.मी., कर्जत-52.60 मि.मी., खालापूर-46.00 मि.मी., माणगांव-60.00 मि.मी., रोहा-58.00 मि.मी., सुधागड-43.00 मि.मी., तळा-11.00 मि.मी., महाड-59.40 मि.मी., पोलादपूर-29.00मि.मी., म्हसळा-05.00मि.मी., श्रीवर्धन-140.00 मि.मी., माथेरान-20.00 मि.मी.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 680.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 42.54 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 101.16 % इतकी आहे.

 यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान  माथेरान येथे नोंदविण्यात आले असून तेथे आज अखेर एकूण पर्जन्यमान 4691.70 मि. मी असून  त्याची टक्केवारी 154.42 % आहे. त्या खालोखाल पेण येथे 137.16 %, अलिबाग येथे 119.84 %, उरण 115.37 % तर कर्जत येथे 107.74 % पर्जन्यमान आहे. तर जिल्ह्यात सर्वात कमी पर्जन्यमान श्रीवर्धन येथे 76.79 % इतके नोंदविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक