महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अलिबाग,(जिमाका)दि.13- सन 2017-18 या आर्थिक  वर्षामध्ये महामंडळाच्या राज्य् शासन पुरस्कृत  50% अनुदान योजना या बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांना महामंडळाच्या  www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेत स्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
            महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना:-
1.)50 टक्के अनुदान योजना- या योजनेत प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- पर्यंत आहे. तसेच प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त् रु.10,000/- पर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.
बीज भांडवल योजना:- महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भाग भांडवलामधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1.)प्रकल्प मर्यादा रु.50,000/-ते रु.5 लाखापर्यंत, 2) प्रकल्प्‍ मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4टक्के द.सा.द.शे.व्याजदराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा रु. 10.000/- समावेश आहे.3.)बँकेचे कर्ज 75टक्के देण्यात येते तसेच कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो.,4)महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाच्या आत पूर्ण करावी लागते.5.)अर्जदारास 5टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे-
1.अर्जदाराचे पॅन कार्ड.,2)अर्जदाराच्या जनधन खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स् प्रत.3.)अधिकाऱ्याने कर्जदाराचा सिव्हील रिपोर्ट तपासून नंतर कर्ज मंजूर करण्याची प्रक्रीया करणे.4.)कर्ज मंजूर झाल्यानंतर सदर जनधन खात्याचे कमीत कमी 10 उत्तर दिनांकीत (Post dated cheques) धनादेश देणे.5.)अर्जदाराची रुपे डेबीट कार्डाची (Rupe card) झेरॉक्स  प्रत.,6.)अर्जदाराचा वापरात असलेला भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक)., 7) जातीचा व उत्पन्नाचा समक्ष अधिकाऱ्यांनी दिलेले दाखला.8.)दोन पासपोर्ट आकाराचा फोटो.,9) रेशनकार्ड,मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड. 10.) कोटेशन, व्यावसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुसार इतर आवश्यक दाखले.11.) आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प् अहवाल. 12.)व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले पत्र.उदा.वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स् ,परमिट ,कॅब नंबर इत्यादी 
तरी इच्छुक अर्जदारांनी महामंडळाकडून कर्ज घेण्याकरीता त्यांचे स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरुन ऑनलाईन पद्धतीने दि.15 सप्टेंबर 2017  पर्यंत कर्ज मिळण्याकरिता कर्ज मागणी अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी दिनांक 14 ऑक्टोबर  2017 रोजी पर्यंत कर्ज मागणी अर्जांची मूळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित/ स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित या जिल्हा कार्यालयात व्यक्तीश: सादर करावीत. त्रयस्थ् व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी.असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित अलिबाग रायगड यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक