पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.27(जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे..

शुक्रवार दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 4.00 वा. मुंबई येथून शासकीय वाहनाने देवन्हावे ता. खालापूरकडे प्रयाण. सायं. 5:30 वा. देवन्हावे ता. खालापूर येथे आगमन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. स्थळ : नोवाटेल इमॅजिका हॉटेल,खोपोली पाली रोड, ता.खालापूर.  कार्यक्रमानंतर सोयीनुसार देवन्हावे ता.खालापूर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण व सुतारवाडी ता. रोहा निवासस्थानी आगमन व राखीव.

 शनिवार दि. 28 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 8.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने ता.रोहाकडे प्रयाण. सकाळी 8.30 वा. रोहा येथे आगमन व गणेश मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : दमखाडी ता. रोहा, सकाळी 9:30 वा. रोहा येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण. सकाळी 11:30 वा. ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रभाकर भुस्कुटे यांच्या रायगडची हिरकणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: विरेश्वर मंदिर महाड.  दुपारी 1.00 वा. महाड येथून शासकीय वाहनाने वडघर ता.माणगावकडे प्रयाण.  दुपारी 2.00 वा. वडघर ता. माणगाव येथे आगमन व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकास सदिच्छा भेट.  दुपारी 3.00 वा. माणगाव येथून शासकीय वाहनाने ता.तळाकडे प्रयाण. सायं. 4.00 वा. तळेगड ता. तळा येथे आगमन व परिसर सुधारणा पोहोच रस्ता भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.   सायं. 5.00 वा. गो.म.वेदक विद्यामंदिर, तळा येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा.  सायं.6.00 वा. मौजे वावे हवेली ता. तळा येथे शासकीय अधिकारी व ग्रामस्थां समवेत बैठक.  सायं.7.00 वा. मौजे चरई खुर्द (आदिवासी वाडी) ता.तळा येथे शासकीय अधिकारी व ग्रामस्थांसमवेत बैठक. रात्रौ 8.00 वा. राखीव.  रात्रौ 8.30 वा. तळा येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता. रोडकडे प्रयाण. रात्रौ 9.45 वा. सुतारवाडी येथे आगमन व राखीव.

 सोमवार दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने लोणेरे, ता. माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. लोणेरे येथे आगमन व श्री अंकुश खडस यांचे चि.ओमकार यांच्या शुभविवाहानिमित्त सदिच्छा भेट. स्थळ: होटेल सुगरणच्या मागे, लोणेरे, ता.माणगाव.  सकाळी 11:30 वा. लोणेरे येथून शासकीय वाहनाने गोरेगावमार्गे दिवेआगर ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. दिवेआगर येथे आगमन व श्री. महादेव पाटील यांचे चिरंजीव ॲङ मुकेश यांच्या शुभविवाहास उपस्थिती. स्थळ : सिद्धगिरी निवास, हनुमान पाखडी, दिवेआगर. दुपारी 1.30 वा. दिवेआगर येथून शासकीय वाहनाने दिघी बंदराकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. दिघी बंदर येथे आगमन जेट्टीमार्गे राजपुरी जेट्टीकडे प्रयाण.  दुपारी 2.30 वा. राजपूरी जेट्टी येथून शासकीय वाहनाने अलिबागकडे प्रयाण.  सायं. 4.00 वा. अलिबाग येथे आगमन व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी दौरा व बैठकीस उपस्थिती.  स्थळ : जिल्हा सामान्य रुग्णालय,अलिबाग व आर.सी.एफ, वसाहत, कुरुळ/थळ.  सायं. 5.00 वा.अलिबाग जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी.  सायं. 5.30 वा. जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग अद्यावतीकरण व आधुनिकीकरण पाहणी दौरा. स्थळ : जिल्हा पशुवैद्यकीय चिकित्सालय, अलिबाग.  सोयीनुसार अलिबाग येथून शासकीय वाहनाने सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण आणि  रोहा येथे आगमन व राखीव.

मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 सकाळी 7.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने दिवेआगर ता. श्रीवर्धनकडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. दिवेआगर येथे आगमन व श्री.मंगेश कोमनाक  (पंचायत समिती सदस्य) यांच्या शुभविवाहास उपस्थिती. स्थळ : दिवेआगर.  दुपारी 2.00 वा. दिवेआगर येथून शासकीय वाहनाने सुतारवाडीकडे प्रयाण.  सायंकाळी 4.30 वा. सुतारवाडी ता. रोहा निवासस्थान येथे आगमन व राखीव.  सायं. 7.00 वा.सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक