1 जानेवारी 2021 च्या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

 

अलिबाग, जि.रायगड,दि.23 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी, 2021 या अर्हता दिनांकावर आधारित  मतदारयादीचा पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. 

दि.17 नोव्हेंबर, 2020 ते 15 डिसेंबर, 2020-हरकती व दावे स्विकारले जातील. मतदारयादीत नाव समाविष्ट होण्यासाठी त्यांनी फॉर्म नं.06 भरुन देणे आवश्यक आहे. मयत व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी फॉर्म नं.07 तसेच मतदारयादीत वय, लिंग, नाव यामध्ये दुरुस्ती असेल तर फॉर्म नं.08 भरुन दयावयाचा आहे. या नाव नोंदणीत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अंतिम मतदारयादी दि.15 जानेवारी 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदारयादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अलिबाग तहसिलदार तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी सचिन शेजाळ यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक