नवोदय विद्यालय नववी साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

 


अलिबाग,जि.रायगड दि. 25 (जिमाका):-  भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाद्वारे संचलित माणगाव तालुक्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ष 2021-22 साठी इयत्ता नववी मध्ये प्रवेश परीक्षे साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 असून www.navodaya.gov.in किंवा www.nvsadmissionclassnine.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

              यावर्षी इयत्ता आठवीत शिकत असलेले आणि दि.01 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान जन्मतारीख असलेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. परीक्षा दि.13 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9:30 वा. जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर येथे होईल. 

             रायगड जिल्ह्यातील आठवी मध्ये शिकत असलेल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी नवोदय स्टाफ संतोष चिंचकर मो.9881351601, कैलास वाघ मो.9527256185 यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य एस.व्ही.बोभाटे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड