ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदार यादीचे प्रभाग निहाय कार्यक्रम प्रसिध्द

 


अलिबाग,जि.रायगड दि. 27 (जिमाका) :-  मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी माहे एप्रिल ते जून 2020 या कालायधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या व माहे जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी दि. 25सप्टेंबर 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली महाराष्ट्र विधान सभेची मतदार यादी वापरण्याचे निदेश दिले आहेत. तसेच मतदार यादीचे प्रभाग निहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

अलिबाग तालुक्यातील सासवणे, मान तर्फे झिराड, पेझारी व वाघोडे या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींसाठी मतदार यादी प्रभाग निहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक, शुक्रवार, दि. 25 सप्टेंबर 2020, प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक, मंगळवार दि.01 डिसेंबर 2020, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी मंगळवार दि. 01 डिसेंबर ते सोमवार दि.07 डिसेंबर 2020, प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिष्द करणे, गुरुवार दि.10 डिसेंबर 2020.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक