जागतिक महिला दिनानिमित्त अलिबाग येथे “स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5)” या परिसंवादाचे आयोजन

  


अलिबाग,दि.04 (जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि.08 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यक्रमाचे सकाळी 10.00 वाजता येथील पी.एन.पी नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, जे.एस.एम. महाविद्यालय, अलिबाग आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रिया आणि लोकशाही – लोकशाही गप्पा (भाग 5) या परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, वैशाली पाटील, मुमताज शेख, प्रयोगशील शिक्षक सुजाता पाटील, प्राध्यापक डॉ.श्याम पाखरे, पत्रकार जयंत धुळप, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत सोनवणे हे सहभागी होणार असून संवादक म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.दीपक पवार हे जबाबदारी सांभाळणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजक मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य श्री.श्रीकांत देशपांडे असून सहआयोजक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि जे.एस.एम. महाविद्यालय अलिबागचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील हे आहेत.

तरी या कार्यक्रमास नागरिकांनी, प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक