औद्योगिक आवेदनपत्रधारक घटकांनी डेटा अपडेट करावा - महाव्यवस्थापक श्री.हरळय्या

 

अलिबाग,दि.04 (जिमाका):- उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने दि.25 मार्च 2021 पासून आय.ई.एम अर्ज भरण्यासाठी एक सुधारित जी2बी पोर्टल (http://services.dipp.gov.in/ims) सुरू केले आहे. एका आय.ई.एम कंपनी व्यवसाय घटकाच्या नावाने त्याच्या युनिटच्या स्थानाचा विचार न करता केवळ एकच आय.ई.एम जारी केला जात आहे. याकरिता अर्जदाराने पोर्टलवर लॉग-इन करून त्यांच्या आय.ई.एम संदर्भात डेटा  अपडेट किंवा पुनर्प्रमाणित करण्यासाठी दि.15 जुलै 2021 पासून जी2बी पोर्टलमध्ये एक वेगळी विंडो प्रदान करण्यात आली आहे. अर्जदारांना ऑनलाइन प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी वापरकर्ता मॅन्युअल आणि व्हिडिओ ट्यूटोरियल जी2बी पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहेत.

तरी संबंधित आय.ई.एम (औद्योगिक आवेदनपत्र धारक) घटकांमध्ये कोणताही बदल नसला तरीही सर्व आय.ई.एम धारकांना नव्याने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर पुन:श्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सर्व अर्जदारांना आवश्यक तेथे आधारभूत कागदपत्रे जोडावी लागणार असून अशा सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी करताना अर्जदारांना एक क्यू-आर कोड आधारित पोहोच पावती दिली जाणार आहे.

जिल्ह्यातील सर्व उद्योग घटक, औद्योगिक संघटना, आय.ई.एम धारक यांच्यापर्यंत याबाबतची माहिती पोहोचविण्याकरिता स्थानिक पातळीवरून जिल्हा उद्योग केंद्राकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच प्रत्यक्षात उत्पादनात गेलेल्या उद्योग घटकांकडून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर संपर्क साधून त्वरित आय.ई.एम पार्ट भरून घेणे आवश्यक आहे.

तरी उत्पादनापूर्वीच्या इतर टप्प्यातील आय.ई.एम धारक उपक्रमांनी नव्या संकेतस्थळावर पार्ट ए बाबतची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस. हरळय्या यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक